फक्त नोंदणी करा आणि मिळवा मोफत भांडी संच – बांधकाम कामगारांसाठी योजना सुरू

भांडी वाटप योजनेसंबंधी एक महत्त्वाची माहिती आली आहे. ज्या बांधकाम कामगारांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्यासाठी आता एक चांगली संधी आहे. आता या योजनेसाठी नोंदणी ऑनलाइन करता येणार आहे आणि ती कामगार स्वतःच्या मोबाइलवरून घरी बसून करू शकतात.

नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://hikit.mahabocw.in/appointment या वेबसाईटवर जायचं आहे. पूर्वी ही नोंदणी कामगार स्वतः करू शकत नव्हते, पण आता सरकारने ती सोपी करून दिली आहे. तुम्हाला फक्त तुमचा “नोंदणी क्रमांक” (Registration Number) टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आणि माहिती स्क्रीनवर दिसेल.

जर तुम्हाला नोंदणी क्रमांक आठवत नसेल, तर https://iwbms.mahabocw.in/profile-login या वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक टाका आणि पुढची प्रक्रिया करा. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल. हा नंबर घेऊन पुन्हा पहिल्या वेबसाईटवर जाऊन माहिती भरायची आहे.

माहिती भरल्यानंतर पुढचं पाऊल म्हणजे “स्लॉट निवड”. यात तुमच्या जवळपास कुठे कॅम्प आहे त्याची यादी येईल. तुम्हाला हव्या त्या ठिकाणचा कॅम्प निवडा. त्यानंतर तारखा दिसतील – लाल रंगात असलेल्या तारखा म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे, पिवळ्या रंगात असलेल्या तारखा म्हणजे आधीच बुक झाल्या आहेत. तुम्ही रिकाम्या असलेल्या तारखांपैकी एक निवडू शकता.

त्यानंतर एक “घोषणापत्र” (Declaration Form) दिसेल. त्याची प्रिंट काढा, ते भरून पुन्हा अपलोड करा. मग “अपॉइंटमेंट लेटर” मिळेल, ते देखील प्रिंट करून घ्या.

ज्या दिवशी तुम्ही निवडलेली तारीख आहे, त्या दिवशी कॅम्पमध्ये पोहोचायचं आहे. सोबत आवश्यक कागदपत्रे न्यायची आहेत. हे सर्व कागद दाखवल्यावर तुम्हाला भांड्यांचा संच (cookware set) दिला जाईल.

ही संधी खूप महत्त्वाची आहे. कामगारांनी वेळेत नोंदणी करून आपला लाभ घ्यावा. तसेच शासनाकडून बोगस लाभार्थ्यांवर नजर ठेवली जात आहे, त्यामुळे फक्त खर्‍या पात्र कामगारांनीच अर्ज करावा.

Leave a Comment